सद्गुरु जग्गी वासुदेव आणि त्यांच्या आश्रमावरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात उठवला होता आवाज !
(हिंदु मक्कल कत्छी म्हणजे हिंदु जनता पक्ष)
चेन्नई – ‘हिंदु मक्कल कत्छी’ या प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे युवा नेते ओंकार बालाजी यांना तमिळनाडू पोलिसांनी नुकतीच अवैध अटक केली. ‘हिंदु मक्कल कत्छी’च्या २७ ऑक्टोबरला कोईंबतूर येथे झालेल्या निषेध मोर्च्यात ओंकार बालाजी यांनी केलेल्या भाषणाचे कारण देत त्यांना अटक करण्यात आली. ओंकार यांनी त्यांच्या भाषणात ‘नक्कीरन’ या तमिळ नियतकालिकाचे संपादक गोपाळ यांनी सद्गुरु जग्गी वासुदेव आणि ‘ईशा योग केंद्र’ यांच्याविषयी केलेल्या नाहक आरोपांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामुळे तमिळनाडू पोलीस आणि ‘नक्कीरन’ यांनी त्यांचा छळ चालू केला. ते सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या सूचनेनुसार काम करत असल्याचा आरोप आहे. ‘हिंदु मक्कल कत्छी’चे संस्थापक अध्यक्ष अर्जुन संपत यांनी यासंदर्भात ‘सनातन प्रभात’ला माहिती दिली. ओंकार बालाजी यांचे हिंदु धर्माचे कार्य दडपण्याचे प्रयत्न चालवले जात आहेत, असा आरोपही संपत यांनी या वेळी केला.
१. ओंकार यांनी ‘ईशा फाऊंडेशन’च्या विरोधातील पोलीस कारवाईचा निषेध केल्याने द्रमुकचे नेते महंमद खलील याने त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
२. त्यानंतर बालाजी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, जो मद्रास उच्च न्यायालयाने संमत केला. पोलिसांनी कायदेशीर नियमावलीचे उल्लंघन करून बालाजी यांना अटक केली. पुढे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
३. ‘हिंदु मक्कल कत्छी’ने तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना ओंकार यांना न्याय्य वागणूक मिळावी, अशी विनंती केली आहे.
४. हिंदु समाज आणि हिंदु संस्था यांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न यापुढेही हाणून पाडला जाईल, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
५. #JusticeForOmkar या हॅशटॅगने ओंकार बालाजी यांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन ‘सनातन प्रभात’ने त्याच्या एक्स खात्यावरून केले आहे.
🚨 Important Update on devout Hindu leader Omkar Balaji’s Case 🚨
Omkar Balaji, the youth leader of Hindu Makkal Katchi @Indumakalktchi, is facing targeted harassment led by TamilNadu police & Nakkheeran TV having more than 3 million YT subscribers! Needless to say, that they… pic.twitter.com/NcOhiVLdVw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 15, 2024
तमिळनाडू पोलिसांचा हिंदुत्वनिष्ठ नेत्याला अपकीर्त करण्याचा घृणास्पद प्रकार !तमिळनाडू पोलिसांनी ओंकार बालाजी यांना अवैध अटक करून रात्रभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवले, तसेच एका अट्टल गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या गळ्यात गुन्हेगाराची पाटी घालून त्यांचे छायाचित्र काढले आणि सामाजिक माध्यमांतून ते प्रसारित केले. |
Hindu paper News!
HC refuses to restrain police from arresting Omkar Balaji
Justice A.D. Jagadish Chandira simply adjourns his anticipatory bail plea by a week without granting any interim protection
The Madras High Court on Wednesday refused to restrain Coimbatore city… pic.twitter.com/mUtCNLrSev
— Arjun Sampath (@imkarjunsampath) November 14, 2024
संपादकीय भूमिका
|