Free GAZA On Road : कल्याण येथे रस्त्यावर मुसलमानांकडून गाझामुक्तीविषयी लिखाण !

इस्रायलच्या विरोधातही केले अश्‍लील लिखाण

रस्त्यावर मुसलमानांकडून गाझामुक्तीविषयी लिखाण

कल्याण – येथे सकाळी फिरायला येणार्‍यांसाठी प्रसिद्ध असणार्‍या गांधारी परिसरातील ‘रिंग रोड’वर (शहरातील रहदारी टाळण्यासाठी बनवलेला शहराबाहेरील पर्यायी मार्ग) मुसलमानांनी ‘गाझा मुक्त करा,’ असे इंग्रजी भाषेत लिहून इस्रायलच्या विरोधात अश्‍लील लिखाण केले आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्येही मुसलमानांनी तेथे ‘फ्री पॅलेस्टाईन’ (पॅलेस्टाईन मुक्त करा) असे लिहिले होते. त्या वेळी शहरातील शांतता भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा नागरिकांनी पोलिसांकडे आरोप केला होता.

संपादकीय भूमिका

अशांवर सरकार काय कारवाई करणार ?