हारतुर्यांचे सहस्रो रुपये विधायक कामांसाठी उपयोगी पडू शकतात, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
ठाणे – महानगरपालिकेतील विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, उपक्रम यांसाठी आणि पदाधिकारी अन् अधिकारी यांना पुष्पगुच्छ, तुळशीचे रोप, हार-तुरे देण्यासाठी, तसेच फुलांची सजावट आदी साहित्यासाठी प्रतिदिन साडेपाच सहस्र रुपये व्यय करण्याचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने सिद्ध केला आहे. वर्ष २०२०-२१ आणि वर्ष २०२१-२२ या दोन वर्षांसाठी ४० लाख रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव सिद्ध करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर या दिवशी होणार्या महासभेत हा प्रस्ताव मांडला जाणार असून या प्रस्तावाला भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे, तसेच त्याला विरोध करण्याचे घोषित केले आहे.