मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील सुनावणी १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली  

भगवान श्रीकृष्णजन्मभूमी

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील जिल्हा न्यायालयात भगवान श्रीकृष्णजन्मभूमीविषयी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी आता १० डिसेंबरला होणार आहे. न्यायालयाने याविषयी पाठवलेल्या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी ट्रस्ट मस्जिद ईदगाह कमेटी, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि श्रीकृष्णजन्मभूमी सेवा संघ यांनी वेळ मागितला होता. श्रीकृष्ण विराजमानसह ८ याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने स्वीकारून ही नोटीस दिली होती.