जानेवारी ते मार्च २०२४ या काळात लाचखोरीच्या प्रमाणात घट !
यंदा जानेवारी ते मार्च या ३ महिन्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत वर्ष २०२४ च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत सापळे १६ टक्क्यांनी घटले. लाचखोरांची संख्याही ३२१ वरून २६९ पर्यंत घसरली आहे.