हवेली (पुणे) येथील भूकरमापक याच्यासह खासगी व्यक्तीला लाच घेतांना अटक !

पुणे – देहूगाव येथील भूमी मोजण्यासाठी आणि क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितली. त्यातील ५० सहस्र रुपये घेतांना हवेली मोजणी कार्यालयातील भूकरमापक दौलत गायकवाड आणि खासगी व्यक्ती योगेश्वर मारणे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. (अशा लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच इतर लाचखोरी करण्यास धजावणार नाहीत ! – संपादक) ही कारवाई २० जून या दिवशी हवेली येथे करण्यात आली. या दोघांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.