महापालिकेच्‍या २ लिपिकांविरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद !

पुणे – नवीन बांधलेल्‍या घराचा कर अल्‍प करण्‍यासाठी २५ सहस्र रुपयांची लाच मागणार्‍या औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिकेच्‍या सुमित चांदेरे आणि प्रशांत घाडग या २ लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. रात्री विलंबाने दोघांविरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद झाला आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्‍त करून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करणे आवश्‍यक ! – संपादक)