सासवड (जिल्हा पुणे) – ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत संमत घरकुलाची रक्कम मिळवून देण्यासाठी ‘पी.एम्.आर्.डी.ए.’मध्ये कंत्राटी कामकाज करणारे कनिष्ठ अभियंता तेजस तावरे, ‘पी.एम्.आर्.डी.ए.’चे अभियंता हेमंत वांढेकर आणि रामदास उपाख्य बाबू कटके यांना ५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना कह्यात घेतले आहे. तक्रारदारांनी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत त्यांच्या वडिलांच्या नावाने घरकुलासाठी अर्ज केला होता. या योजनेतून तक्रारदारांना घरकुलाचे २ लाख ५० सहस्र रुपये अनुदान संमत झाले होते. पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाल्यावर उर्वरित रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी हेमंत वांढेकर आणि रामदास कटके यांनी तक्रारदारांकडे ५० सहस्र रुपये मागितले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर आरोपींना लाच स्वीकारतांना कह्यात घेतले.
संपादकीय भूमिका :अशा भ्रष्टाचार्यांमुळेच कोणताही लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |