तळेगाव दाभाडे – सातबारा उतार्यावर गिनी गवताची नोंद अल्प करून नवीन दुरुस्त सातबारा देण्याच्या कामासाठी शेतकर्याकडून १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी खांडशी येथील अंकुश साठे या तलाठ्याला कह्यात घेतले आहे. (तळागाळातील शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार चालू असणे हे संतापजनक ! भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !- संपादक) कार्ला मंडलाधिकारी कार्यालयामध्ये ही कारवाई झाली. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पथकाने सापळा रचून आरोपीला कह्यात घेतले.