लाच घेणारा अभियंता राजेश सलगरकर याच्या मिरज येथील बँक लॉकरमध्ये कोट्यवधी रुपये आणि सोने मिळाले !

पाटबंधारे विभागात कार्यरत असलेला कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याला २८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना परळी येथे रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

बारामती येथे तलाठ्याच्या नावाने लाच घेतांना खासगी व्यक्तीस अटक !

अजूनही तळागाळात भ्रष्टाचार चालू आहे, तर देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?

बीड येथे पोलिसांच्या घरात सापडले १ कोटी रुपये, तसेच सोन्या-चांदीचे दागिने !

पोलीस खात्यात असे पोलीस असतील, तर कधीतरी देश भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशांना कठोर शिक्षाच हवी !

नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकार्‍याला ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात लाचखोरीचा शिरकाव होणे निंदनीय ! अशा लाचखोरांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !

लाच स्वीकारतांना वरिष्ठ लिपिकास रंगेहात पकडले !

अशा लाचखोरांवर कठोर शिक्षा झाल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास न्यायालयाची नोटीस !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच नोटीस द्यावी लागत असेल, तर कधीतरी देशातील भ्रष्टाचार संपेल का ?

जानेवारी ते मार्च २०२४ या काळात लाचखोरीच्या प्रमाणात घट !

यंदा जानेवारी ते मार्च या ३ महिन्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत वर्ष २०२४ च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत सापळे १६ टक्क्यांनी घटले. लाचखोरांची संख्याही ३२१ वरून २६९ पर्यंत घसरली आहे.

लाच मागितल्याप्रकरणी थेऊरच्या (पुणे) विजय नाईकनवरे यांच्यावर दुसर्‍यांदा गुन्हा नोंद !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग ! लाच प्रकरणामध्ये केवळ गुन्हा नोंद करून काही उपयोग होत नाही, हे दर्शवणारी घटना ! लाचप्रकरणी सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला लगेचच शिक्षा होणे आवश्यक आहे !

लाच घेणार्‍या पीएच्.डी. मार्गदर्शकावर पुणे विद्यापीठ कारवाई करणार !

असे लाचखोर प्राध्यापक विद्यार्थ्यांना काय घडवणार ? त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचीही चौकशी केली पाहिजे !

महसूल साहाय्यकाने लाच मागितल्याप्रकरणी त्याला अटक !

शेतकर्‍याकडे थेट लाच मागण्याचे धारिष्ट्य प्रशासकीय अधिकारी करतात. भ्रष्टाचाराची ही बजबजपुरी संपण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !