पुणे येथे लाच घेतांना दिघी पोलीस ठाण्‍यातील पोलीस हवालदारास अटक !

गुन्‍हा नोंद करण्‍यासाठी केली लाचेची मागणी !

सौजन्य : पोलीसनामा संकेतस्थळ

पुणे – बांधकाम व्‍यावसायिकाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यासाठी पोलिसाने २ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. त्‍यातील १ लाख ७० सहस्र रुपये घेतांना दिघी पोलीस ठाण्‍यातील हवालदार अमोल जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या प्रकरणी ४२ वर्षीय नागरिकाने तक्रार प्रविष्‍ट केली होती.

तक्रारदाराने बांधकाम व्‍यावसायिकाकडून चर्‍होलीतील चोवीसवाडी येथे एक सदनिका खरेदी केली होती; परंतु बांधकाम व्‍यावसायिकाने ती सदनिका परस्‍पर दुसर्‍याला विकून तक्रारदाराची फसवणूक केली होती. त्‍याविषयी तक्रारदाराने दिघी पोलीस ठाण्‍यात तक्रार अर्ज दिला होता.

संपादकीय भूमिका :

  • असे लाचखोर पोलीस, पोलीस ठाण्‍यात असतील, तर जनतेला न्‍याय कसा मिळणार ?
  • पोलिसाने लाच घेणे म्‍हणजे ‘कुंपणाने शेत खाण्‍याचा प्रकार’ असून अशा पोलिसांना बडतर्फ करायला हवे !