डॉ. आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापिठातील लाचखोर अधिकारी अटकेत !

८१ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले

प्रतिकात्मक चित्र

अलिबाग – लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापिठातील वित्त अधिकारी ओंकार अंबपकर याला ठेकेदाराकडून ८१ सहस्र रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. रायगडच्‍या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी गुन्‍हा नोंदवण्यात आला आहे. ६७ लाख रुपयांचे देयक संमत करण्‍यासाठी अंबपकर यांनी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यात तडजोडीअंती लाचेची रक्‍कम ८१ सहस्र रुपये निश्चित झाली. संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर त्यांनी सापळा रचून वरील कारवाई केली.

संपादकीय भूमिका :

अशा लाचखोरांना बडतर्फच करायला हवे !