माझे वक्‍तव्‍य वरिष्‍ठांचा अपमान करणारे असून चांगले काम करणे हे नैतिक दायित्‍व आहे !

युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने पालकांविषयी केलेल्‍या आक्षेपार्ह विधानाच्‍या संदर्भात त्‍याच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे. या प्रकरणात तो पसार असून त्याचा भ्रमणभाष बंद आहे, अशी वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली होती.

‘कार्डियाक अरेस्‍ट’ झालेल्‍या रुग्‍णांसाठी ‘कोल्‍स – कॉम्‍प्रेशन ओन्‍ली लाइफ सपोर्ट’ ही ‘कार्डियाक रिसस्‌सिटेशन’ची (‘हृदय-पुनरुज्‍जीवन तंत्रा’ची) प्रक्रिया म्‍हणजे एक संजीवनी !

जोपर्यंत रुग्‍णाचा श्‍वास आणि हालचाल चालू होत नाही, तोपर्यंत, तसेच पुढील वैद्यकीय सुविधा मिळण्‍यासाठी रुग्‍णालयात हस्‍तांतरण करीपर्यंत छातीदाबन चालू ठेवणे आवश्‍यक आहे.

शिवजयंती महोत्‍सवाच्‍या निधीत ६० टक्‍के कपात !

शिवजयंती महोत्‍सवाला डावलून पर्यटनवृद्धीसाठी महाबळेश्‍वर महोत्‍सवाच्‍या निधीत वाढ करणे हा इतिहासद्रोह नव्‍हे का ? 

मराठी भाषा आणि कविता यांची आवड नसतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या  संकल्‍पशक्‍तीमुळे कविता स्‍फुरू लागल्‍याविषयी पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) यांनी वर्णिलेली सूत्रे

मानवी शरीर विषाने (स्‍वभावदोष आणि अहं यांनी) व्‍यापलेल्‍या झाडासमान आहे आणि ते विष केवळ गुरुरूपी अमृतानेच स्‍वच्‍छ होऊ शकते. हे गुरुरूपी अमृत मिळवण्‍यासाठी आपले जीवन त्‍यागावे लागले, तरी तो व्‍यवहार स्‍वस्‍त आणि अधिक लाभदायक आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी कोल्‍हापूर येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव सोहळा तिरुपति येथे प्रत्‍यक्ष श्री बालाजीच्‍या प्रांगणात चालू आहे’, असे मला अनुभवता आले. काही वेळा मला ‘तो ब्रह्मांडात चालू आहे’, असेही वाटले. तो मला प्रत्‍यक्ष समोर दिसत होता. तेव्‍हा सर्वत्र आल्‍हाददायक वातावरण अनुभवता आले.’

आध्‍यात्मिक पातळीविषयीचे अध्‍यात्‍मशास्‍त्र आणि ज्ञानयोगातील अवतार सिद्धांतानुसार व्‍याख्‍या अन् त्‍यामागील शास्‍त्र

अध्‍यात्‍मशास्‍त्र प्रायोगिक आणि अद्वैताशी निगडित संकल्‍पना आहे. यामुळे त्यात गुरु आणि शिष्य असे दोन घटक असून शिष्याला गुरूंमध्ये सर्व देवतांची आणि पुढे स्वतःमध्ये गुरुतत्त्वाची अनुभूती येऊन अद्वैताकडे जाता येते. याउलट ज्ञानयोग विवेचनात्मक असून ‘ज्ञान हेच गुरु’, असे त्याचे तत्त्व असल्याने चराचरात देवत्वाची व्याख्‍या करून त्याची अनुभूती घेता येते. अध्यात्‍मशास्त्र आकाशतत्त्वाशी, तर ज्ञानयोग तेजतत्त्वाशी संबंधित आहे.

रामनाथी आश्रमात आलेल्या एका कीर्तनकारांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ संत घोषित झाल्यानंतर त्यांना संत घोषित करण्यापूर्वीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढण्यामागील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले कारण

‘एकदा अन्‍य एका राज्‍यातील कीर्तनकारांनी  सनातनच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्‍या वेळी एका कार्यक्रमात त्‍या किर्तनकारांना ‘संत’ म्‍हणून घोषित करण्‍यात आले. या कार्यक्रमाला परात्पर गुरु डॉ. आठवले उपस्थित होते. आध्यात्‍मिक संशोधनाच्या उद्देशाने संत घोषित करण्यापूर्वी किर्तनकारांची ‘यू.एस्. (युनिव्हर्‍सल स्कॅनर)’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजण्यात आली. त्या वेळी त्यांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २९ मीटर इतकी होती. … Read more

‘नामजपाने साधकाचा आध्‍यात्मिक त्रास कसा दूर होतो ?’, या संदर्भातील आध्‍यात्मिक विश्‍लेषण !

नामजपातून निर्माण होणार्‍या सूक्ष्म दैवी कणांनी साधकाच्‍या शरिरातील रज-तमयुक्‍त सूक्ष्म काळे कण नष्‍ट होऊ लागतात. त्‍यामुळे साधकाला ‘शारीरिक त्रास न्‍यून होणे, हलकेपणा जाणवणे, मनाला उत्‍साह येणे, मन सकारात्‍मक होणे, ईश्‍वरी आनंद अनुभवणे आणि साधनेतील अडथळे न्यून होणे’ या अनुभूती येतात.