रामनाथी आश्रमात आलेल्या एका कीर्तनकारांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ संत घोषित झाल्यानंतर त्यांना संत घोषित करण्यापूर्वीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढण्यामागील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले कारण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा अन्‍य एका राज्‍यातील कीर्तनकारांनी  सनातनच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्‍या वेळी एका कार्यक्रमात त्‍या किर्तनकारांना ‘संत’ म्‍हणून घोषित करण्‍यात आले. या कार्यक्रमाला परात्पर गुरु डॉ. आठवले उपस्थित होते. आध्यात्‍मिक संशोधनाच्या उद्देशाने संत घोषित करण्यापूर्वी किर्तनकारांची ‘यू.एस्. (युनिव्हर्‍सल स्कॅनर)’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजण्यात आली. त्या वेळी त्यांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २९ मीटर इतकी होती. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी कीर्तनकारांना ‘संत’ म्हणून घोषित केले. या कार्यक्रमानंतर संत-किर्तनकारांची ‘यू.एस्.’ उपकरणाद्वारे परत चाचणी करण्यात आली. त्या वेळी त्यांची सकारात्मक ऊर्‍जेची प्रभावळ ७१ मीटर इतकी होती.

श्री. राम होनप

या विषयी मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना विचारले, ‘‘संत म्‍हणून घोषित झाल्‍यानंतर त्‍या कीर्तनकारांची सकारात्‍मक ऊर्जा दुप्‍पटीपेक्षा अधिक झाली. त्‍यामागील कारण काय ?’’ त्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टर मला म्‍हणाले, ‘‘संत घोषित होण्‍याच्‍या कार्यक्रमाद्वारे त्‍या कीर्तनकारांना ईश्‍वराचा आशीर्वाद मिळाला. त्‍यामुळे त्‍या वेळी त्‍या संतांची आध्यात्मिक पातळी १ – २ टक्क्‍यांनी वाढली. परिणामी त्यांची सकारात्मक ऊर्जा आणखी वाढली.’’ हे ऐकून मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘हे आपल्या संकल्पामुळे होते का ?’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्‍हणाले, ‘‘ईश्वराच्‍या आशीर्वादामुळे !’’

–  श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.