आध्‍यात्मिक पातळीविषयीचे अध्‍यात्‍मशास्‍त्र आणि ज्ञानयोगातील अवतार सिद्धांतानुसार व्‍याख्‍या अन् त्‍यामागील शास्‍त्र

श्री. निषाद देशमुख

१. आध्‍यात्मिक पातळीविषयीचे अध्‍यात्‍मशास्‍त्र आणि ज्ञानयोगातील ‘अवतार सिद्धांतानुसार’ व्याख्या

टीप १ – ज्ञानयोगात ‘अवतार सिद्धांत’ सांगितले आहेत. यानुसार प्रत्‍येक जीव ईश्‍वराचा अंश असल्‍याने अवतारच ठरतो. या रकान्‍यात ज्ञानयोगानुसार विविध अवतारांचा उल्लेख दिला आहे.

टीप २ – अवतारांना आध्‍यात्मिक पातळी नसते; कारण ते कार्यस्‍वरूप, म्‍हणजे कार्य करण्‍यासाठी निर्गुणातून प्रकट झालेले असतात. याउलट गुरु निर्गुणाकडे वाटचाल करत असल्‍याने त्‍यांना आध्यात्मिक पातळी असते. यामुळे अध्यात्मशास्त्‍रानुसार गुरूंच्या स्तरामध्ये ‘अवतार’ असा उल्लेख करणे चुकीचे ठरते. याऐवजी ‘परात्पर गुरु’, ‘जगद्गुरु’ किंवा ‘योगतज्ञ’ असे विशेषण घेणे अधिक योग्य ठरते.

टीप ३ – अध्‍यात्‍मशास्‍त्र आणि ज्ञानयोग यांच्‍या विचारसरणीतील भेद : अध्‍यात्‍मशास्‍त्र प्रायोगिक आणि अद्वैताशी निगडित संकल्‍पना आहे. यामुळे त्यात गुरु आणि शिष्य असे दोन घटक असून शिष्याला गुरूंमध्ये सर्व देवतांची आणि पुढे स्वतःमध्ये गुरुतत्त्वाची अनुभूती येऊन अद्वैताकडे जाता येते. याउलट ज्ञानयोग विवेचनात्मक असून ‘ज्ञान हेच गुरु’, असे त्याचे तत्त्व असल्याने चराचरात देवत्वाची व्याख्‍या करून त्याची अनुभूती घेता येते. अध्यात्‍मशास्त्र आकाशतत्त्वाशी, तर ज्ञानयोग तेजतत्त्वाशी संबंधित आहे. यामुळे अध्यात्मशास्‍त्रात ज्ञानस्वरूपानुसार, तर ज्ञानयोगात ईश्वरी प्‍रकटीकरणानुसार जिवाची व्याख्या अनुक्रमे गुरुपद आणि अवतारत्व या प्‍रकारे केली जाते, उदा. अध्यात्मशास्त्‍राच्‍या शिकवणीमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतःसहित इतरांचा उल्लेख संत, सद्गुरु यांप्रकारे करतात. याउलट ज्ञानयोगामुळे महर्षि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासहित इतरांचाही उल्लेख ‘कार्तिकीपुत्री’, ‘उत्तरापुत्री’, अशा प्रकारे म्हणजे, ‘अवतार’ म्हणून करतात.

२. गुरु आणि अवतार यांमधील भेद 

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (वर्ष २०२४ मधील आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के) फोंडा, गोवा. (१३.७.२०१९, दुपारी १.४६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.