पुणे – शिवनेरीवर आणि जुन्नर तालुक्यात राज्यशासनाच्या पर्यटन अन् सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणार्या ‘महादुर्ग उत्सव’ कार्यक्रमाच्या निधीत ६० टक्के कपात करून हा निधी ९ कोटी रुपयांवरून ४ कोटी रुपयांवर आणण्यात आला आहे.
शिवनेरी शिवजयंती महोत्सवाला देण्यात येणारा निधी ‘महाबळेश्वर महोत्सवा’कडे वळवण्यात आला आहे. महाबळेश्वर महोत्सवाला प्रत्येक वर्षी १४ कोटी रुपयांचा निधी देण्यात येतो. यामध्ये वाढ करून यंदा २१ कोटी रुपयांपर्यंत निधी वाढवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाशिवजयंती महोत्सवाला डावलून पर्यटनवृद्धीसाठी महाबळेश्वर महोत्सवाच्या निधीत वाढ करणे हा इतिहासद्रोह नव्हे का ? |