श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची आयकर विभागाकडून चौकशी !

श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर

सातारा, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे चुलत बंधू तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने चौकशी चालू केली. संजीवराजे आणि रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी असलेल्या ‘जय व्हिला’ आणि ‘सरोज व्हिला’ या ठिकाणी ५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ६ वाजता आयकर विभागाची पथके आली. येथे संजीवराजे यांची चौकशी चालू केली. संजीवराजे यांच्या फलटणसह सातारा, पुणे आणि मुंबई या ठिकाणच्या निवासस्थानीही धाडी घालण्यात आल्या आहेत.

रामराजे नाईक-निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेचे आमदार आहेत. दुसर्‍या बाजूला संजीवराजे आणि रघुनाथराजे यांनी विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता.