सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवावर विनोद केल्याचे प्रकरण
‘अनेकदा विनंती करूनही या कार्यक्रमाच्या ठिकाणचे लोक सीसीटीव्ही चित्रण देण्यास नकार देत आहेत. पोलिसांनी साहाय्याचे आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात काही केले नाही’, असे मोरे याने ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे. |

मुंबई – २ फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी ५.४५ वाजता प्रणित मोरे या विनोदी कलाकाराचा (‘स्टँड अप कॉमेडियन’) ‘२४ के के क्राफ्ट ब्रूझ’ हा सोलापूर येथील कार्यक्रम संपल्यावर तो चाहत्यांमध्ये गेला होता. तेव्हा १२ जणांच्या टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून धमकी दिली. त्या टोळक्याने अतिशय क्रूरपणे प्रणितवर आक्रमण करून त्याला घायाळ केले. तन्वीर शेख या टोळीचा प्रमुख होता. ‘पुन्हा वीर पहारियावर विनोद करून दाखव, वाईट परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी त्या टोळीतील एकाने दिली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील नवोदित अभिनेते वीर पहारियावर विनोद केल्यामुळे त्याला मारहाण केल्याची ‘पोस्ट’ मोरे याने केली आहे. या घटनास्थळी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती. अभिनेता वीर पहारिया हा काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.
संपादकीय भूमिकाअभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गळे काढणारे आता कुठल्या बिळात लपून बसले आहेत ? |