हिंदु राष्ट्राविषयी लावण्यात आलेले फलक का काढण्यात आले, हे प्रशासनाने स्पष्ट करावे ! – आचार्य महामंडलेश्‍वर जागृत चेतना गिरि, मातृशक्ती आखाडा

आचार्य महामंडलेश्‍वर जागृत चेतना गिरि

प्रयागराज, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्राविषयी ठेवलेला विचार आपण सर्वांनी घ्यायला हवा. आपण सर्व हिंदु बांधवांसाठी हिंदु राष्ट्र असायला हवे. आपण सर्वांनी याविषयी जागृत रहावे. कुंभ तर हिंदुत्वाचाच मेळा आहे. मग हिंदु राष्ट्राविषयी लावण्यात आलेले फलक का काढण्यात आले ? हे प्रशासनाने स्पष्ट करावे, असे मत आचार्य महामंडलेश्‍वर जागृत चेतना गिरि यांनी व्यक्त केले. महाकुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला त्यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी अनुमोदन दिले आणि ‘हिंदु संतो की गर्जना – हिंदु राष्ट्र’ फलकासमोर थांबून ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा घोषणा दिल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, हिंदु जनजागृती समिती एक मोठा संकल्प घेऊन कार्य करत आहे. यात कोणतीही अडवणूक व्हायला नाही पाहिजे. हिंदु राष्ट्र सर्वांनाच हवे आहे. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. आपण सर्व हिंदूंनी संकल्प घेऊया,की, हिंदु राष्ट्र स्थापन करायचेच आहे.