वाढेफाटा (सातारा) चौकातील ‘हायमास्ट’ पथदीप बंद !

‘हायमास्ट’ पथदीप (प्रतिकात्मक छायाचित्र)

सातारा, ५ फ्रेबुवारी (वार्ता.) – येथील उपनगरांना सातारा शहराशी जोडणारा वाढे फाटा चौक अत्यंत महत्त्वाचा चौक आहे; मात्र गत ६ मासांपासून वाढे फाटा चौकातील ‘हायमास्ट’ पथदीप बंद आहेत. हे पथदीप बंद असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे, तसेच जिल्ह्यातील चोरीच्या घटना, गोळीबारीच्या घटना पहाता नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाडे फाटा परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी भीतीच्या वातावरणामध्ये वावरत आहेत. त्यामुळे या खांबावरील ‘हायमास्ट’ पथदीप संबंधित विभागाने तातडीने चालू करावेत, अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिक करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?