कठीण प्रसंगांत स्थिर रहाणार्या आणि तळमळीने सेवा करणार्या वाराणसी येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती शोभा मिलिंद खरे (वय ६३ वर्षे) !
‘खरेकाकूंनी (सासूबाईंनी) सर्व प्रकारच्या सेवा केल्या आहेत. त्या वयाच्या ५० व्या वर्षानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि स्मरणिका यांमध्ये छपाई करण्यात येणार्या विज्ञापनांची संरचना करायला शिकल्या. त्यासाठी लागणारी संगणकीय प्रणाली (‘सॉफ्टवेअर’) त्यांनी हळूहळू शिकून घेतली.