एरंडोली (तालुका मिरज) येथे विवाहाच्‍या दुसर्‍याच दिवशी दागिने आणि रक्‍कम घेऊन वधू पसार !

युवकाची ४ लाख ७० सहस्र रुपयांची फसवणूक !

सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला प्रसिद्ध आचारी विष्‍णु मनोहर यांची सदिच्‍छा भेट !

चंपाषष्‍ठीच्‍या निमित्ताने नागपूरच्‍या कॉटन मार्केट येथील खंडोबा मंदिरात सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक वस्‍तूंचे प्रदर्शन लावण्‍यात आले होते.

१९ वर्षीय मद्यपी तरुणाकडून वाहनांना धडक !

तरुण पिढीने व्‍यसनाधीन होणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलित ! मुलांवर योग्‍य संस्‍कार होण्‍यासाठी त्‍यांना शाळांमधून धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !

आळंदी वारसास्‍थळ संवर्धनाचे दायित्‍व सर्वांचेच ! – ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक अरुण बोर्‍हाडे

भारतातील १८ शिवपिठांपैकी एक असलेल्‍या आळंदी देवाची येथील पुरातन वारसा असलेल्‍या तीर्थ आणि कुंड यांचा अभ्‍यास दौरा ‘इंद्रायणी साहित्‍य परिषदे’च्‍या वतीने आयोजित करण्‍यात आला होता. त्‍या वेळी अरुण बोर्‍हाडे बोलत होते.

भोसरी (पुणे) येथे सासर्‍याचा सुनेवर पतीसमोर लैंगिक अत्‍याचार !

समाजाची नैतिकता किती खालच्‍या स्‍तराला गेली आहे, याचे उदाहरण ! अशांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

(म्‍हणे) ‘स्‍त्रियांच्‍या लैंगिक शोषणाचे समर्थन धर्मग्रंथांनी केले असल्‍याचे पेरियार यांनी अभ्‍यासात दाखवून दिले !’ – प्रा. डॉ. देवकुमार अहिरे

प्रा. डॉ. देवकुमार अहिरे यांची ‘अंनिस’च्‍या प्रकाशन सोहळ्‍यात हिंदुद्वेषी गरळओक !

कुर्ला (मुंबई) येथे बेस्‍टच्‍या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्‍यू !

चौकशी समितीची स्‍थापना !  चालकाला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मुंबई – कुर्ला (पश्‍चिम) येथील महानगरपालिकेच्‍या एल् विभागाच्‍या कार्यालयाजवळ ९ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता बेस्‍टच्‍या बस क्रमांक ‘ए-३३२’चा अपघात झाला. या अपघातामध्‍ये ७ जणांचा मृत्‍यू झाला असून ४९ जण घायाळ झाले आहेत. अपघातामधील मृतांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे. अपघाताच्‍या अन्‍वेषणासाठी बेस्‍टच्‍या मुख्‍य व्‍यवस्‍थापकांच्‍या (वाहतूक) अध्‍यक्षतेखाली समिती … Read more

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने शिवप्रतापदिनी जळगाव येथे १० ठिकाणी छत्रपती शिवरायांना अभिवादन !

शिवप्रतापदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने जिल्‍ह्यात १० ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी छत्रपती शिवरायांच्‍या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्‍यात आले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन ! ; सांगली येथे ‘इ.व्‍ही.एम्. मशीन गो बॅक’ स्‍वाक्षरी मोहीम !…

राज्‍य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. मुंबईच्‍या विधानभवनात विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.