नागपूर येथे हॉटेलमध्ये बाँब ठेवल्याची धमकी !

नागपूर – येथील गणेशपेठ बसस्टँडजवळच्या द्वारकामाई हॉटेलमध्ये बाँब ठेवल्याची धमकी ९ डिसेंबर या दिवशी ‘इ-मेल’च्या माध्यमातून देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांसह बी.डी.डी.एस्. पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी आले होते. धमकीनंतर सुरक्षेच्या दृष्टीने हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हॉटेलची पडताळणी करण्यात आली. पोलिसांना पडताळणीच्या वेळी कोणतीही संशयास्पद गोष्ट सापडलेली नाही.

संपादकीय भूमिका

वारंवार अशा धमक्या मिळणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचेच लक्षण !