प्रा. डॉ. देवकुमार अहिरे यांची ‘अंनिस’च्या प्रकाशन सोहळ्यात हिंदुद्वेषी गरळओक !
पुणे, १० डिसेंबर (वार्ता.) – जे धर्मग्रंथ आहेत, त्यांमध्ये स्त्रियांच्या लैंगिक शोषणाला एक प्रकारची अधीमान्यता दिली आहे. म्हणजेच एक प्रकारे स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचे समर्थन धर्मग्रंथांनी केले आहे, असे पेरियारांनी त्यांच्या अभ्यासात दाखवून दिले आहे; म्हणून ते धर्मग्रंथांचीही कठोर चिकित्सा करत होते, अशी हिंदुद्वेषी गरळओक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. देवकुमार अहिरे यांनी केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वार्षिक विशेषांक २०२४’ प्रकाशन सोहळा आणि ऑनलाईन व्याख्यान ७ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
अहिरे यांनी ‘आजच्या काळाच्या संदर्भात पेरियार विचार’ याविषयी माहिती सांगितली. मुखपत्राचे प्रकाशन अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मुंबई रॅशनॅलिस्ट फोरम’चे अध्यक्ष रवीचंद्रन् हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनीही प्रा. अहिरे यांच्या मताचे समर्थन केले.
अहिरे यांनी मांडलेले हिंदुद्वेषी विचार !
१. काही लोक जे ‘आम्ही आधी हिंदु होतो’, असे म्हणत होते, ते अचानकपणे आता आम्ही सनातन धर्मीय आहोत, आमचा धर्म सनातन धर्म आहे आणि असे जाहीरपणे म्हणू लागले आहेत. एका अर्थाने तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन धर्माचे निर्मूलन केले पाहिजे’, असे जे भाष्य केले होते, त्याला विरोध म्हणून आम्ही कसे सनातन धर्मीय आहोत ? असे म्हणायला त्यांनी आरंभ केला आहे. त्या अज्ञानाचे निर्मूलन करण्यासाठी हा अंक प्रेरित करील. (हिंदु धर्म हाच सनातन धर्म, हे प्राध्यापक महाशयांना कधीतरी लक्षात येणार का ? – संपादक)
२. स्त्रियांच्या दास्यत्वतेचे समर्थन म्हणजे सनातन धर्म ! याउलट पेरियारांनी समानतेचा विचार समाजात मांडलेला आहे, जो विचार समाजसुधारकही आहे. त्यामुळे केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी पेरियारांचा स्त्रीविषयक विचार महत्त्वाचा आहे. (पेरियारांच्या हिंदुद्वेषी विचारांचे समर्थन म्हणजे हिंदु धर्माला विरोध आहे, हे लक्षात घेऊन या प्राध्यापकावर विद्यापिठाने कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)
३. पेरियारांचा समधर्म आणि बाबासाहेब आंबेडकरांची सधम्म कल्पना हे दोन्ही अत्यंत जवळचे आहेत. पारंपरिक धर्मामध्ये नैतिकतेची चर्चा असली, तरी तिथे अनैतिक आचरण आहे म्हणजे कुणालातरी श्रेष्ठ म्हटले आहे, कुणालातरी दुय्यम म्हटले आहे, पुरुषांना विशेष अधिकार आहेत. स्त्रियांना ‘पापयोनी’ म्हटले आहे. (सनातन हिंदु धर्माने कुणावरही अन्याय करण्याची कधीही शिकवण दिली नाही, उलट कायम ‘वसुधैव कुटुम्बकम्’, तसेच सर्वजण सुखी होवोत, अशी प्रार्थना केली आहे. हिंदु धर्माने स्त्रीला आदिमाया, शक्तीचे रूप मानले आहे. अन्य धर्मियांमध्ये स्त्रीला उपभोगाची वस्तू समजले जाते. विवाह करार मानून तिहेरी तलाक मानणे, ‘बहुपत्नीत्व’ प्रथा मानणे हे प्रा. अहिरे यांना योग्य वाटते का ? – संपादक)
पेरियार कोण होते ?
पेरियार हे तमिळनाडूतील कथित समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. जातीयवाद नष्ट करण्याच्या नावाखाली त्यांनी हिंदु धर्माच्या विरोधात सातत्याने गरळओक केली.
धर्मग्रंथांविषयी काडीचेही ज्ञान नसतांना केवळ हिंदु धर्माला अपकीर्त करण्याच्या हेतूने असे वक्तव्य करणार्या अहिरे यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. अन्य धर्माविषयी असे वक्तव्य करण्याचे धाडस अहिरे करतील का ?
कार्यक्रमाचा फज्जा !
या कार्यक्रमाचा जोरदार प्रसार करूनही ‘फेसबुक लाईव्ह’ला हा कार्यक्रम पहाणार्यांची संख्या अगदीच नगण्य होती.