युवकाची ४ लाख ७० सहस्र रुपयांची फसवणूक !
सांगली, १० डिसेंबर (वार्ता.) – विवाह लावून देण्यासाठी पैशांची मागणी करून विवाहाच्या दुसर्याच दिवशी दागिने आणि रोख रक्कम असे एकूण ४ लाख ७० सहस्र रुपये घेऊन वधू पसार झाली. ही फसवणूक केल्याप्रकरणी एका युवकाने बोरगाव (तालुका मिरज) पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. वर्षा ठाकूर (मु.पो. तळणी, तालुका सिल्लोड), जान्हवी सोळंके (रा. सिडको स्कीम, खोतकरवाडा, संभाजीनगर), ताराचंद पुंडलिक आधाणी (रा. पेरणे, ता. हवेली, जिल्हा पुणे) आणि श्रीकांत शिंदे अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. हा विवाह लावून देणार्यांना युवकाने २ लाख ६० सहस्र रुपये दिले होते.