१९ वर्षीय मद्यपी तरुणाकडून वाहनांना धडक !

पुणे – बाणेर येथे १९ वर्षाच्‍या तरुणाने मद्यपान करून वाहनांना धडक दिल्‍याने ३ ते ४ वाहनांची हानी झाली आहे. या घटनेचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला असून ऋतिक बनसोडे याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ही घटना घडतांना नागरिकांनी आरोपी चालकाला वाहन थांबवण्‍याची विनंती करूनही त्‍याने ती गाडी पुढे नेली. त्‍यामुळे जमलेल्‍या तरुणांनी दुचाकीवरून आरोपीचा पाठलाग करून त्‍याला पोलिसांच्‍या कह्यात दिले.

संपादकीय भूमिका :

तरुण पिढीने व्‍यसनाधीन होणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलित ! मुलांवर योग्‍य संस्‍कार होण्‍यासाठी त्‍यांना शाळांमधून धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !