नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन !
मुंबई – राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. मुंबईच्या विधानभवनात विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची चर्चा करण्यात आली. या बैठकीत आगामी हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार उपस्थित होते.
सांगली येथे ‘इ.व्ही.एम्. मशीन गो बॅक’ स्वाक्षरी मोहीम !
सांगली, १० डिसेंबर (वार्ता.) – ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रणा ‘हॅक’ करून मतदाराच्या मताची चोरी केली जाते. स्वातंत्र्य आणि लोकशाही यांचा गळा घोटणार्या ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रणेला हद्दपार करून सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी येथे केली. १० डिसेंबर या दिवशी येथे ‘इ.व्ही.एम्. मशीन गो बॅक’ या स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते.