खंडवा (मध्यप्रदेश) येथे आतंकवादविरोधी मशाल मोर्चामध्ये आग लागल्याने ५० जण घायाळ

खंडवा, मध्यप्रदेश येथे काढण्यात आलेल्या मशाल मोर्चामुळे आग लागल्याने ५० जण घायाळ झाले. आग लागल्याने येथे चेंगराचेंगरीही झाली.

आळंदी (पुणे) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वेळी चोर्‍या !

सोहळ्यानिमित्त पोलीस बंदोबस्त असतांना अशा घटना घडतात, म्हणजेच पोलिसांचा वचक अल्प झाला आहे, हेच लक्षात येते !

मिरज येथे माजी आमदार डॉ. एन्.आर्. पाठक स्मृतीदिनानिमित्त आज व्याख्यान आणि शिबिर !

सकाळी ८ वाजता दिवंगत डॉ. पाठक यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून ९ वाजता शिबिर घेतले जाईल. दिवंगत डॉ. पाठक नामांकित वैद्यकीय तज्ञ म्हणून प्रसिद्ध होते.

चिन्‍मय प्रभु आणि इस्‍कॉनचे १६ जण यांची बँक खाती गोठवली !

बांगलादेशाच्‍या बँकेच्‍या वित्तीय गुप्‍तचर विभागाने देशातील बँका आणि वित्तीय संस्‍थ यांना निर्देश पाठवले असून चिन्‍मय प्रभु अन् इस्‍कॉनचे १६ सदस्‍य यांची बँक खाती गोठवण्‍यात आली आहेत.

अमरावती येथे ‘ब्रह्माकुमारीज’च्या वतीने सनातन संस्थेचा सन्मान !

रुक्मिणीनगर येथील ‘ब्रह्माकुमारीज’ सेवाकेंद्रात २५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित कार्यक्रमात समाजसेवेसाठी विविध क्षेत्रांतील संस्था आणि मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘सनातन संस्थे’चाही विशेष सन्मान करण्यात आला.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा !

पुणे येथील याज्ञवल्क्य आश्रमात २७ नोव्हेंबर या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगोचित ‘समाधि साधन संजीवन नाम’, हे गीत सुभाष आंबेकर यांनी प्रस्तुत केले.

पर्वरी (गोवा) येथे ३० नोव्हेंबरला होणार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सवी सन्मान !

गोवा राज्यात स्थापन झालेल्या आणि सध्या संपूर्ण भारतात सनातन हिंदु धर्माचा तेजस्वी प्रचार करणार्‍या सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा साजरा होणार आहे.

कॅनडाकडून भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकार्‍यांची केली जात आहे हेरगिरी !

भारताने आता कॅनडावर संपूर्ण बहिष्कार घालत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याची आवश्यकता आहे, हेच यातून स्पष्ट होते !

Raj Kundra Pornography Case : अश्‍लील व्हिडिओप्रकरणात मुंबईसह उत्तरप्रदेशातील १५ ठिकाणी ईडीची धाड !

अश्‍लील व्हिडिओ निर्मितीच्या माध्यमातून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) मुंबईसह उत्तरप्रदेशातील १५ ठिकाणी धाडी घातल्या आहेत.

आतंकवाद्यांना साहाय्य केल्याप्रकरणी बांगलादेशी घुसखोरांना ५ वर्षांचा कारावास !

बनावट कागदपत्रांच्या आधारे या बांगलादेशी घुसखोरांनी ‘पॅनकार्ड’, ‘आधार ओळखपत्र’, ‘मतदार ओळखपत्र’, ‘शिधापत्रिका’ आदी कागदपत्रे मिळवल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केला होता.