पुणे शहरातील पराभूत उमेदवार ‘इ.व्ही.एम्.’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाणार !

विधानसभा निवडणुकीमध्ये ‘महाविकास’ आघाडीला अपयश आले. येथील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’मध्ये (‘इ.व्ही.एम्.’मध्ये) घोटाळा झाल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगलीसह राज्यातील ४५ शहरांमध्ये आता शिरस्त्राण बंधनकारक !

विनाशिरस्त्राण दुचाकी चालवल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड, तसेच ३ महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मिरज (जिल्हा सांगली) येथे कराडचे भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांचा सत्कार !

सातारा जिल्ह्यातील कराड उत्तरचे भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी येथील भाजपचे माजी नगरसेवक गणेश माळी यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘देवाचे हात’ या प्रदर्शनाचे तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते उद्घाटन !

प्रदर्शनात प्राचीन मंदिरे, मूर्ती यांची छायाचित्रे पहाण्याची संधी !

पुणे शहरामध्ये सध्या तरी शिरस्त्राणसक्ती नाही ! – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

विनाशिरस्त्राण दुचाकीस्वार आणि बसलेला सहप्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याच्या काढलेल्या आदेशाला सध्या स्थगिती दिली आहे.

भांडुप येथे ३ विद्यार्थिनींची छेड काढणार्‍या कर्मचार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

शालेय विद्यार्थिनींसमवेत तेथील कर्मचार्‍यांकडून होणारे अश्लील वर्तनाचे प्रकार शालेय प्रशासनासाठी चिंताजनक ! अशा वासनांध कर्मचार्‍यांना कामावरून काढूनच टाकायला हवे !

गडहिंग्लजमध्ये (जिल्हा कोल्हापूर) शहेजाद शेख याच्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग : दोघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद !

बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांची वारंवारता पहाता जोपर्यंत असे करणार्‍यांना तात्काळ कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणे कठीण आहे !

मुलीच्या वाढदिवसानिमित्त सनातनच्या साधिकेकडून शाळेत सनातनची बालसंस्कारविषयीची ग्रंथमालिका भेट !

पनवेल येथील सनातनच्या साधिका सौ. पूर्वा कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या शाळेत, म्हणजे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालयात सनातन संस्थेने प्रकाशित केलेली बालसंस्कारविषयीची ग्रंथमालिका ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत भेट दिली.

उत्तराखंड संस्कृत विश्‍वविद्यालयाकडून प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा विशेष सन्मान !

२९ नोव्हेंबरला सायंकाळी आयोजित केलेल्या विश्‍वविद्यालयाच्या ११व्या दीक्षांत समारंभात प.पू. स्वामीजींना ‘विद्यावाचस्पति’ (डी.लिट्) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. वैदिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानासाठी प.पू. स्वामीजींना सन्मानित करण्यात आले.

हडपसर (पुणे) येथे एम्.बी.ए.चे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीचा विनयभंग !

असे वासनांध प्राचार्य आणि संस्था विद्यार्थ्यांना काय शिकवणार ? असा प्रश्न निर्माण होतो ! शैक्षणिक क्षेत्रामध्ये घडणार्‍या अशा घटना पहाता समाजाची नीतीमत्ता आणि नैतिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, हे लक्षात येते !