५१ अध्यायांच्या पोथीमधून निघाला अंगारा !
येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधीपती सुधाकर घरत यांची कन्या कांचन सुतार यांच्या घरी समर्थांच्या ५१ अध्यायांच्या पोथीतून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे.
येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधीपती सुधाकर घरत यांची कन्या कांचन सुतार यांच्या घरी समर्थांच्या ५१ अध्यायांच्या पोथीतून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे.
इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ने (‘पीटीआय’ने) त्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. ‘इम्रान खान यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेतला जाईल’, असे ‘पीटीआय’ने म्हटले आहे.
चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना अटक करण्याच्या प्रकरणी आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले की, तिथे जे घडत आहे ते पाहून पुष्कळ वाईट वाटते.
जत तालुक्याच्या विकासाचे स्वप्न घेऊन आम्ही जत येथे आलो आहे. विरोधकांनी भूमीपुत्र म्हणून हिणवले, खालच्या पातळीला जाऊन टीका केली; पण जतकरांनी ‘विकासपुत्र’ म्हणत आम्हाला जे भरभरून प्रेम दिले, ते पडळकर बंधू कधीच विसरणार नाहीत.
ब्रिटनमध्ये आयुर्वेदाच्या औषधांचा वापर झपाट्याने वाढत आहे. आता ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेत आयुर्वेदाचा औपचारिक समावेश करण्याची सिद्धता चालू झाली आहे. एका सर्वपक्षीय समितीने आयुर्वेदाची प्रभावी आणि उत्तम औषध प्रणाली म्हणून शिफारस केली आहे.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना २६ नोव्हेंबर या दिवशी दूरभाष करून ‘मुख्यमंत्रीपदासाठी माझा कोणताही अडसर नाही’, असे सांगितले आहे. मुख्यमंत्रीपदाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल.
चर्चचे भ्रष्ट कामकाज यातून दिसून येते. चर्चच्या भ्रष्ट कारभाराविषयी निधर्मीवादी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
गिर्ये, रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राकडून या संदर्भात कोणतेही दिशादर्शन मिळत नाही. उत्पादकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी या आंबा संशोधन केंद्रातून ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती केली जात आहे, हा काय प्रकार आहे ?
जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून चालवण्यात येणार्या संसदेचे कामकाज गदारोळ करून स्थगित करण्यास भाग पाडणार्यांकडून हा पैसा वसूल का केला जात नाही ? आता जनतेनेच यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
सरकारकडून यासंदर्भात ठोस कारवाई झालेली पहावयास मिळत नाही. संस्कृतीरक्षण, तसेच समाजमन सक्षम ठेवणे, याला सरकारने प्राधान्य द्यावे, असेच जनतेला वाटते !