दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : इलेक्ट्रिकच्या दुकानाला आग !; पुण्यातील अवैध हुक्का पार्लरवर धाड !

येथील मुंबई नाका परिसरातील शताब्दी रुग्णालयाच्या संकुलात तळमजल्यावरील इलेक्ट्रिकच्या दुकानाला रात्री १ वाजता आग लागली होती. २ घंटे शर्थीने प्रयत्न करून अग्नीशमनदलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

म्हाळुंगे (पुणे) येथे ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करणार्‍याला अटक

अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा द्यायला हवी !

मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण ९ व्या दिवशी स्थगित !

मराठा समाजाच्या वतीने मला उपोषण न करण्याचा आग्रह करण्यात आला होता. मला वारंवार विनंती केली. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहोत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

हुपरी (कोल्हापूर) येथील अवैध मदरसा वापर प्रशासनाकडून प्रतिबंधित !

अवैध मदरशाची पाणीजोडणी या अगोदरच तोडण्यात आली असून वीजतोडणी तात्काळ तोडण्याचे पत्र वीज वितरण आस्थापनास प्रशासनाने दिले.

बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकला ! – सुरेश चव्हाणके

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन केव्हा पावले उचलणार ?

२७ सप्टेंबरला ठाण्यातील काही भागांत पाणीपुरवठा बंद

महानगरपालिकेच्या पिसे आणि टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन, पंपिग यंत्रणेची तातडीची निगा, देखभाल, दुरुस्ती आणि अन्य कामे करण्यासाठी काही भागांत पाणीपुरवठा बंद..

गंगापूर येथे महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा !

महाराजांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना कडक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ आणि भक्त यांनी केली आहे. 

शिक्षणविरोधी धोरणांच्या विरोधात राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन

पुणे, कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे दौरे असल्यामुळे येथील आंदोलन पुढे ढकलण्यात आले.

जिंकलेल्या जागांनुसारच महायुतीच्या जागांचे वाटप ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

वर्ष २०१९ मध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी जिंकलेल्या जागांच्या व्यतिरिक्त ८८ जागांच्या वाटपाविषयी चर्चा होईल, असे या वेळी अजित पवार म्हणाले.

Himachal Pradesh Adopting Yogi Model : हिमाचल प्रदेशातही भोजनालयांवर मालकांची ओळख लिहिली जाणार !

नगरविकासमंत्री विक्रमादित्य सिंह यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे.