प्रत्येक राज्यात हिंदु विचारवंतांचे संघटन होणे आवश्यक ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा चौथा दिवस (२७ जून)

श्री. मोहन गौडा

कर्नाटकमध्ये एका डॉक्टर हिंदु युवती आणि हमाल मुसलमान युवक यांचा आंतरधर्मीय विवाह असल्याची माहिती विवाह नोंदणी कार्यालयाकडून वृत्तपत्रांमध्ये प्रसारित करण्यात आली. याविषयीचा संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांवरून प्रसारित झाल्यावर २ घंट्यांमध्येच एका मुसलमान व्यक्तीने याविषयी कारवाई करण्याचे पोलिसांना आवाहन केले. काही मुसलमान अधिवक्त्यांनी याविषयी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विवाह नोंदणी कार्यालयाकडून केले जाणारे प्रसारण न करण्याची मागणी केली. एका संदेशावरून केवळ २ दिवसांमध्येच मुसलमान यासाठी एकवटले. हिंदूंनीही अशा प्रकारची संपर्कव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु विचारवंतांचे संघटन आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध राज्यांत हिंदु विचारवंतांचे संघटन केले जात आहे. यामुळे हिंदूंचा दबावगट निर्माण होऊ शकेल, तसेच हिंदु धर्मावरील वैचारिक आक्रमणाला योग्य प्रकारे प्रत्युत्तर देता येईल.