चोरीला गेलेले ३१ भ्रमणभाष पोलिसांनी शोधले !

सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचा वापर

नवी मुंबई – सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचे साहाय्य घेऊन कोपरखैरणे पोलिसांनी चोरीला गेलेले ८ लाख रुपये किमतीचे ३१ भ्रमणभाष शोधून काढले आहेत. ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. यामध्ये १ लाख ४० सहस्र रुपयांचा आयफोन ते ५ सहस्र रुपयांच्या साध्या भ्रमणभाषचाही समावेश आहे.

संबंधित पोर्टलवर भ्रमणभाषची तांत्रिक माहिती टाकल्यावर तो सध्या कोणत्या ठिकाणी आहे ?, त्यातील सिमचा क्रमांक काय ?, याची माहिती मिळते. अशा प्रकारे यातील एक आयफोन दुबई येथून मिळवण्यात आला आहे.