संसदेतून राजदंड (सेंगोल) हटवून तेथे राज्यघटना ठेवा !

समाजवादी पक्षाचे खासदार आर्.के. चौधरी यांची मागणी

नवी देहली – संसदेत स्थापन करण्यात आलेला राजदंड (सेंगोल) हटवून त्या ठिकाणी देशाची राज्यघटना ठेवावी, लेखी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार आर्.के. चौधरी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली. मागच्या वर्षी नव्या लोकसभेत राजदंड ठेवण्यात आला आहे. हा राजदंड ब्रिटिशांनी पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या हाती सोपवला होता. ‘आम्ही आता सत्ता सोडत आहोत तुम्ही ती स्वीकारा’, हा त्याचा प्रतीकात्मक अर्थ होता. आर्.के. चौधरी म्हणाले, ‘‘राजदंड याचा अर्थ राजाच्या हाती असलेला दंड असाही होतो; पण राजेशाही संपून देश स्वतंत्र झाला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मग सत्ता राजदंडाप्रमाणे चालणार आहे कि राज्यटनेप्रमाणे ?’’ भाजपने या मागणीस विरोध केला आहे.