पनवेलमध्ये १ मेट्रिक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त !

पनवेल – पनवेल महापालिकेमधील पनवेल, कामोठे, कळंबोली आणि खारघर या परिसरातून १ मेट्रिक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यातून ५५ सहस्र रुपयांचा दंड व्यापार्‍यांकडून वसूल केला आहे. मागील अनेक वर्षांत १ मेट्रिक टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्याची पनवेल महापालिकेची ही पहिलीच वेळ आहे.