अंकले (जिल्हा सांगली) येथे २० जणांना जेवणातून विषबाधा !

सांगली, १३ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंकले या गावी सुवासिनींच्या कार्यक्रमात दिलेल्या जेवणातून २० जणांना विषबाधा झाली आहे. तुकाराम ऐवळे यांच्या घरी १२ जून या दिवशी हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात पुरणपोळी आणि आमरस यांचे जेवण दिले होते. या जेवणानंतर २० जणांना उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी भरती केले होते. १३ जून या दिवशी दुपारी यातील चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालय येथे उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.