मिरज येथे महापालिकेने ३ धोकादायक घरे पाडली !

प्रतीकात्मक छायाचित्र

मिरज, १३ जून (वार्ता.) –  महापालिकेच्या पथकाने ३ ठिकाणी असलेली धोकादायक घरे पाडली. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने ३७ घरमालकांना त्यांची घरे पाडण्याच्या नोटिसाही बजावल्या आहेत. नोटीस बजावूनही इमारती न पाडल्याने महापालिकेने धोकादायक इमारती पाडण्यास प्रारंभ केला आहे.

बुधवार पेठ, स्वामी वाडाजवळील एका घराची जुनी कमान जेसीबीच्या साहाय्याने पाडली, तसेच इसापुरे गल्ली येथील २५ वर्षांपूर्वीचे जुने पडके घर पाडण्यात आले. नव्या भाजी मंडईजवळील झोपडीचे धोकादायक बांधकाम पाडण्यात आले. कुंभार गल्ली येथील जुने घर त्या घराच्या मालकाने पाडण्यास प्रारंभ केला आहे. यापुढेही अशीच मोहीम राबवण्यात येणार आहे.