अभिनेत्री केतकी चितळे यांचा भाजपला संतप्त प्रश्न !
मुंबई – लोकसभा निवडणुकीत ज्यांनी तुम्हाला मत दिले नाही, त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी तुम्ही १० कोटी रुपये देत आहात ? वक्फ मंडळाच्या सक्षमीकरणासाठी १० कोटी रुपये देऊन विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही हिंदूंचीही मते गमावणार आहात का ?, असा संतप्त प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ अभिनेत्री केतकी चितळे यांनी ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे.
या व्हिडिओमध्ये केतकी चितळे यांनी म्हटले आहे, की वक्फ मंडळाचे सक्षमीकरण करून सनातनी हिंदूंनाही तुम्ही स्वत:पासून तोडणार आहात का ? एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेत अनुत्तीर्ण व्हायचे ठरवल्याप्रमाणे तुम्ही ‘हिंदूंचीही मते नको आहेत’, असे ठरवले आहे का ? ‘वक्फ मंडळाला १० कोटी रुपये देऊन तुम्ही हिंदूंची किती संख्येने मते गमावणार आहात ?’, याचा विचार केला आहे का ? तुमचा विचार काय आहे, हे एकदाचे सांगून टाका.’’
View this post on Instagram
From <https://www.instagram.com/p/C8JFUUtyiwH/?hl=en>
हिंदूंची भूमी बळकावणार्यांचे सक्षमीकरण कशासाठी ?
केतकी चितळे पुढे म्हणाल्या की, वक्फ मंडळाने भूमीवर दावा केला, तर त्या विरोधात कोणत्याही न्यायालयात न्याय मागता येत नाही. त्यासाठी वक्फ प्राधिकरणाकडेच जावे लागते. ज्या वक्फ मंडळाने हिंदूंच्या मोठ्या संख्येने जागा हडप केल्या, त्या मंडळाला रहित करण्याऐवजी तुम्ही त्यांचे सक्षमीकरण करत आहात. असे करणार असाल, तर महाराष्ट्रात बंगालप्रमाणे स्थिती येण्यास वेळ लागणार नाही. मानखुर्दमध्ये बांगलादेशी मुसलमान भरले आहेत. रोहिग्यांनाही डोक्यावर बसवले आहे. आता वक्फ मंडळाचे सक्षमीकरण करून भारताला मुसलमान राष्ट्रच घोषित करा. मग शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून बोंबा मारत फिरू नका. महाराष्ट्र औरंगजेबाचा असल्याचे घोषित करा. वक्फ मंडळाचे सक्षमीकरण करून तुम्ही फुले, आंबेडकर आणि छत्रपती यांची नावे घेऊन उगाच त्यांचा अवमान करू नका; कारण असे कृत्य त्यांनी कधीही केले नाही.
… तर विधानसभेत नोटाला मत देऊ !
लोकसभेत कुणाला मत द्यायचे, हे ठरलेले होते. आपले पंतप्रधान कोण हवेत, ते पाहून मी मत दिले होते; पण विधानसभेत ‘कोणता झेंडा घेऊ हाती ?’ हा प्रश्न पडणार आहे. हे प्रारंभीपासून बोलत होते; पण वक्फ मंडळाच्या सक्षमीकरणासाठी निधी देऊन तुम्ही माझे मत ठाम केले आहे. असे असेल, तर विधानसभेत निश्चितच ‘नोटा’ला (उभ्या राहिलेल्या कोणत्याही उमेदवाराला मत न देण्यासाठी मतदानयंत्रामध्ये असलेली सुविधा) मत देऊ, असे केतकी चितळे यांनी म्हटले आहे.