नागपूर येथे ‘पबजी’च्या नादात तरुणाचा पंप हाऊसच्या पाण्यात बुडून मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – येथे ‘पबजी’ खेळ खेळणार्‍या पुलकित राज शहदादपुरी (वय १६ वर्षे) याचा पंप हाऊसच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी पुलकित मित्रासमवेत अंबाझरी तलावावर पोचला होता.

अंबाझरी तलावात असलेल्या पंप हाऊसजवळ बसून दोघे ‘पबजी’ खेळत होते. तेथील सुरक्षारक्षकाने शिट्टी वाजवल्यावर दोघेही घाबरून तेथून निघून जात होते; मात्र पुलकित खेळण्यात मग्न असल्याने पंप हाऊसमध्ये बनवलेल्या जाळीमधील खड्ड्यातून पुलकित खाली पडला आणि नंतर गायब झाला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आहे.

संपादकीय भूमिका

  • भ्रमणभाषमधील खेळांच्या आहारी जाऊन आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार्‍या तरुण पिढीला पालकांनी दिशा देणे आवश्यक !
  • पालकांनी ‘पबजी’च्या अतिरेकाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आपल्या मुलांना वेळीच सतर्क करावे !