झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

नंदुरबार आणि तळोदा येथे निवेदन

तळोदा येथे तहसीलदारांना निवेदन देतांना धर्माभिमानी

नंदुरबार – संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे तळोदा आणि नंदुरबार येथे केली आहे.

समितीच्या वतीने नंदुरबार येथे निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. या वेळी निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

समितीच्या वतीने तळोदा येथे तहसीलदार दीपक धिवरे यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी निवेदन देतांना सर्वश्री मयूर ढोले, आकाश भोई, चिंतामण जव्हेरी, सचिन शिवदे, आकाश शिवदे, धीरज साठे उपस्थित होते.