मालाड (मुंबई) येथे ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळला मानवी बोटाचा तुकडा !

आईस्क्रीममध्ये आढळला मानवी बोटाचा तुकडा

मुंबई – येथील मालाड परिसरात ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये २ से.मी. लांबीचा मानवी बोटाचा तुकडा सापडला. या प्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तात्काळ ते मानवी बोट न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅबमध्ये) पाठवले आहे. मालाडमधील एका महिलेने ‘यम्मो’ आस्थापनाचे आईस्क्रीम ऑनलाईन मागवले होते. खातांना तिला त्यात बोटाचा तुकडा दिसला. तेव्हा ती ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली.

संपादकीय भूमिका

  • ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करायला हवी ! यासह असे आईस्क्रीम विकणार्‍या ‘यम्मो’ आस्थापनावरही बंदी आणायला हवी !