आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करा !

येवला येथील धर्मप्रेमींकडून निवेदन सादर !

येवला येथे तहसीलदारांना निवेदन देतांना धर्माभिमानी

येवला (नाशिक) – हिंदु मंदिरांविषयी जातीय विद्वेष, घृणा आणि शत्रुत्वाची भावना पसरवून आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे दुष्कृत्य झाकीर नाईक याने केले आहे. संयुक्त राष्ट्र संघात त्याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या कह्यात देण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. समितीच्या वतीने येवला येथे तहसीलदार श्री. आबा महाजन यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. या वेळी निवेदन देतांना सर्वश्री किरण नागपुरे, मधुकर घाटकर, लखन शिंदे, अमोल दाणे, सौरभ सोनवणे, कमलेश खेरुड, अविनाश कुक्कर, अमोल पवार, अनिल हलवाई, सौ. भाग्यश्री नागपुरे, सौ. प्रियांका क्षत्रिय, सौ.वंदना शिंदे, सौ.सुरेखा रसाळ, सौ. विद्या वखारे, कु. रागेश्री देशपांडे, राजेश तांबे हे धर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.