७९ दिवसांनंतर पंढरपूर येथे वारकर्‍यांना श्री विठुरायाचे पदस्पर्श दर्शन चालू !

गेले ७९ दिवस ज्या पांडुरंगाच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आसुसलेले होत. अखेर तो दिवस २ जून, म्हणजेच वैशाख कृष्ण एकादशीला उजाडला. पहाटे ४ वाजता ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली.

China Moon Mission : चंद्राच्या सर्वांत गडद भागात चीनचे यान उतरले !

आता हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करण्यास आरंभ करेल. जर सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले, तर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरून २ किलो नमुने आणेल.

Israel Hamas War : हमासविरोधातील युद्ध थांबवल्यास इस्रायलचे सरकार पाडू !

नेतान्याहू यांच्या सरकारमधील मंत्र्याचीच चेतावणी  

Indian Weapons : तुमची शस्त्रे कुठे पोचत आहेत ?, यावर लक्ष ठेवा !

संरक्षण मंत्रालयाची शस्त्रनिर्मिती करणार्‍या आस्थापनांना चेतावणी

Cyber Scam : मुंबईत नौदल अधिकार्‍याचे क्रेडिट कार्ड वापरून परदेशात व्यवहार झाल्याचे उघड !

सायबर चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढणे आणि त्या रोखू न शकणे पोलिसांना लज्जास्पद !

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक

पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दायित्व दिले असून या समितीची नियोजन बैठक २ जून या दिवशी दुपारी शासकीय विश्रामगृह, कराड येथे आयोजित केली आहे.

Heavy Rains lash Kerala : केरळला मुसळधार पावसाने झोडपले !

केरळमध्ये ३ दिवसांपूर्वीच मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील अनेक भागांत भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून सखल भागांत पाणीही साचले आहे.

‘इगो मिडिया’च्या पूर्व संचालिकेचा जामीन फेटाळला !

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ‘इगो मिडिया आस्थापना’च्या पूर्व संचालिका जान्हवी मराठे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

Delhi HC Verdict : सार्वजनिक भूमीवर साधू, फकीर आदींना समाधी बांधण्याची अनुमती दिल्यास जनहित धोक्यात येईल ! – देहली उच्च न्यायालय

महंत नागा बाबा भोला गिरी यांनी त्यांच्या वारसांच्या माध्यमातून प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर न्यायालयाने ही टीप्पणी केली.

Protest in Israel : इस्रायलमध्ये १ लाखाहून अधिक लोकांची निदर्शने !

शहरात लोकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. या वेळी लोकांनी ‘सरकारने हमासशी ओलिसांच्या सुटकेसंदर्भात करार करावा’, ‘पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पदावरून हकालपट्टी करावी’ आणि ‘देशात लवकर निवडणुका घ्याव्यात’, अशी मागणी केली.