दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक

कर्‍हाड – दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार दुष्काळ पाहणी समिती गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दायित्व दिले असून या समितीची नियोजन बैठक २ जून या दिवशी दुपारी शासकीय विश्रामगृह, कराड येथे आयोजित केली आहे.