मुंबई – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ‘इगो मिडिया आस्थापना’च्या पूर्व संचालिका जान्हवी मराठे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जान्हवी मराठे या डिसेंबर २०२३ पर्यंत ‘इगो मिडिया’ आस्थापनाच्या संचालिका होत्या. त्यांच्या कार्यकाळात घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग उभारण्यात आले होते. विशेष पोलीस पथकाने जान्हवी मराठे यांनाही आरोपी ठरवले आहे.