मुंबई – नौसेनेत ट्रायल अधिकार्याच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी-विक्री करून ४६ सहस्र रुपयांचा व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार अमेरिकन डॉलर्समध्ये करण्यात आला. यासंदर्भात त्यांच्या भ्रमणभाषवर २ संदेश आल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. प्रत्यक्षात त्यांनी कार्डची माहिती किंवा पासवर्ड कुणालाही दिलेला नव्हता. या घटनेनंतर त्यांनी त्यांचे क्रेडिट कार्ड तात्पुरते बंद करण्याची विनंती केली, तसेच तक्रारही प्रविष्ट (दाखल) केली. या प्रकरणी कफ परेड पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. संबंधित अधिकार्याचा भ्रमणभाष हॅक करून हा प्रकार करण्यात आल्याचा संशय आहे.
संपादकीय भूमिकासायबर चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढणे आणि त्या रोखू न शकणे पोलिसांना लज्जास्पद ! |