हिमाचल प्रदेशात ईदच्या दिवशी मुसलमान महिलांसाठी बस प्रवास विनामूल्य !

हिंदूंच्या सणांच्या वेळी कधी हिंदु महिलांना अशी सुविधा का देण्यात येत नाही ? पाकिस्तानातच नव्हे, तर कुठल्याच इस्लामी देशात अशा प्रकारची सुविधा दिली जात नाही; मात्र भारतात जेथे काँग्रेसचे सरकार आहे, तेथे मुसलमानांना त्यांच्या धर्माचे आधारे विविधा सुविधा पुरवल्या जातात, हे लक्षात घ्या !

उत्तराखंडमध्ये बाबा तरसेम सिंह यांची हत्या करणारा पोलीस चकमकीत ठार !

राज्यातील उधमसिंह नगरमधील नानकमट्टा गुरुद्वाराचे कारसेवा प्रमुख बाबा तरसेम सिंह यांच्या हत्येचा आरोपी अमरजीत सिंह हा येथे झालेल्या चकमकीत ठार झाला.

उरुळी कांचनजवळील (पुणे) भवरापूर येथे ‘अंनिस’चा ‘स्मशान भेट’ कार्यक्रम !

भूते पहाण्यासाठी किंवा त्यांचे अस्तित्व जाणवण्यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असते. सूक्ष्म ज्ञानेंद्रिय साधना करूनच जागृत होतात, हे नास्तिकतावाद्यांना केव्हा समजणार ? असे हास्यास्पद उपक्रम राबवून नास्तिकतावादी स्वतःचेच हसे करून घेत आहेत !

काश्मीरच्या सूत्रावर पाकिस्तानने भारताशी चर्चा करावी ! – सौदी अरेबिया

‘जोपर्यंत पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत भारत पाकसमवेत कोणतीही चर्चा करणार नाही’, असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले असल्याने अशी चर्चा कधीही होऊ शकणार नाही, ही वस्तूस्थिती आहे.

दोन्ही देशांनी चर्चा करून तोडगा काढावा ! – अमेरिका

अलीकडच्या काळात भारताचे अनेक शत्रू परदेशी भूमीवर मारले गेले आहेत. पाकिस्तानमध्येही भारताच्या शत्रूंच्या हत्या झाल्या आहेत. पाकिस्तानने भारतावर हा आरोप केला आहे; मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई !

पोलीस प्रशासनाने एकूण ४० हिंदु कार्यकर्त्यांवर कारवाईची सिद्धता केली होती. ही गोष्ट विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांना समजल्यावर त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांना तात्पुरते नमते घ्यावे लागले.

बलुचिस्तानमध्ये झालेल्या २ बाँबस्फोटात तिघांचा मृत्यू, २० घायाळ !

आता यामागे भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चा हात असल्याची आवई पाकिस्तान, कॅनडा अथवा अमेरिका यांनी उठवली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Gudhi Padva 2024 : ४ राज्यांत एकूण ३३८ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन, मंदिर स्वच्छता आणि सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण !

विशेष म्हणजे या वेळी अनेक ठिकाणी मंदिरांची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. गुढीपूजनानंतर सर्वांनी एकत्र येऊन ‘सुराज्य’ स्थापन करण्याची सामूहिक शपथ घेतली.

नाभा (पंजाब) येथे सरकारी महाविद्यालयात प्राचार्यांच्या दालनात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !

महाविद्यालयात आणि तेही प्राचार्यांच्या दालनात अशा घटना घडत असतील, तर जनतेला नैतिकेचे शिक्षण कोण देणार आणि विद्यार्थी कुणाकडे आदर्श म्हणून पहाणार ?

न्यायाधिशांनी अनेक मास निकाल न देता खटला राखून ठेवणे, हा चिंतेचा विषय ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

न्यायाधीश १० महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता खटला राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय आहे, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.