बलुचिस्तानमध्ये झालेल्या २ बाँबस्फोटात तिघांचा मृत्यू, २० घायाळ !

क्वेटा (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांतात दोन वेगवेगळ्या बाँबस्फोटात एका पोलिसासह ३ जण ठार झाले, तर २० जण घायाळ झाले. पहिल्या घटनेत क्वेटा जिल्ह्यातील कुचलाक भागात एका मशिदीत स्फोट झाला. या स्फोटात एका पोलिसाचा मृत्यू झाला, तर १५ जण घायाळ झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाच्या वेळी मशिदीत नमाजपठण चालू होते. दुसरा स्फोट खुजदार शहरातील उमर फारुख चौकात झाला. ईदच्या खरेदीसाठी महिला आणि लहान मुले येथे आली होती. या स्फोटात २ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण घायाळ झाले. दोन्ही बाँबस्फोट मोटरसायकलमध्ये ‘आयईडी’ वापरून करण्यात आले. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने अलीकडच्या आठवड्यात प्रांतात ३ मोठ्या आतंकवादी आक्रमण केल्याचा दावा केला असला, तरी या स्फोटांचे दायित्व अद्याप कुणी स्वीकारलेले नाही.

सौजन्य : The Shillong Times

संपादकीय भूमिका 

आता यामागे भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चा हात असल्याची आवई पाकिस्तान, कॅनडा अथवा अमेरिका यांनी उठवली, तर आश्‍चर्य वाटू नये !