काश्मीरच्या सूत्रावर पाकिस्तानने भारताशी चर्चा करावी ! – सौदी अरेबिया

सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर असणार्‍या पाकच्या पंतप्रधानांना सौदीने सुनावले !

रियाध (सौदी अरेबिया) – पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पहिल्या परदेश दौर्‍यावर सौदी अरेबियामध्ये गेले आहेत; मात्र काश्मीर प्रश्‍नाबाबत सौदी अरेबियाने शाहबाज शरीफ यांना झटका दिला आहे. ‘काश्मीर प्रश्‍न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील द्विपक्षीय प्रश्‍न आहे. भारताशी चर्चा करून तो सोडवावा’, असा सल्ला सौदी अरेबियाने पाकला दिला आहे.

संयुक्त निवेदनात सौदी अरेबियाकडून हे सांगण्यात आले आहे. पाकिस्तान काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रांसह इतर जागतिक मंचांवर मांडत आहे. भारताने नेहमीच त्याला विरोध केला आहे आणि त्याला ‘द्विपक्षीय सूत्र’ म्हटले आहे.

सौजन्य : DNAIndiaNews

संपादकीय भूमिका 

‘जोपर्यंत पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत भारत पाकसमवेत कोणतीही चर्चा करणार नाही’, असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले असल्याने अशी चर्चा कधीही होऊ शकणार नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यात आता ‘पाकमधील हिंदूंचे रक्षण करणे’ अशी अटही जोडली पाहिजे !