नवी देहली – न्यायाधीश १० महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता खटला राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय आहे, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले की, एवढ्या कालावधीनंतर खटल्याची पुन्हा सुनावणी झाली, तर मागील सुनावणीच्या वेळी केलेल्या तोंडी युक्तीवादाचा काही फरक पडत नाही. न्यायाधीशही अनेक गोष्टी विसरतात. या प्रकरणाबाबत सर्व उच्च न्यायालयांना पत्रे लिहिली आहेत. पत्रानंतर मी पाहिले की, अनेक न्यायाधीश केवळ खटले रहित करतात, काही त्यांची सूची करतात आणि नंतर आंशिक सुनावणी करतात.